अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १५/२/२०२० :
आज दिनांक १५/२/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील निगडी कै.मधुकर पवळे उड्डाणपूल येथील ६ अनधिकृत पत्राशेड निष्कसित करण्यात आले आहेत. क्षेत्रफळ अंदाजे ६०० चौ. फुट , तसेच पिंपरी शगुन चौक ते मेन बाजार,व रिव्हर रोड, कराची चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ३
२) प्लास्टिक खुर्ची ४ नग
३) प्लास्टिक स्टुल १ नग
४) पुतळे. ३
५) लेडीज पर्स. अंदाजे. ५० नग
६) लोखंडी जाळी. दरवाजे १२ नग
७) लोखंडी स्टॅण्ड. ८ नग
८) लोखंडी जाळी. १ नग
९) लाकडी प्लायवुड १ नग
१०) प्लास्टिक टेबल २ नग
११) लोखंडी पत्रे. २२ नग
१२) लोखंडी टेबल १ नग
१३) लोखंडी टपरी २ नग
१४) लोखंडी ऍंगल. लुज
१५) लोखंडी बाकडे ५ नग
सदरची कारवाई पथक क्र २ व ३ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता. तसेच होमगार्ड चे पथक हजर होते.