ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२६/१२/१९ :
आज दिनांक २६/१२/१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील थेरगाव ग क्षेत्रिय कार्यालय ते तापकीर चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या २
२) लोखंडी काऊंटर १
तसेच १ टपरी जागेवर निष्कसित करण्यात आली आहे. फुटपाथवरील पत्राशेड व इतर अतिक्रमण काढण्यात आले आहे. सदरची कारवाई बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभाग व अतिक्रमण निर्मूलन व नियंत्रण विभाग पथक क्र २ यांचेमार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी मनपाचे पोलीस पथक हजर होते.