ब व ह क्षे अतिक्रमण कारवाई दि.०४/१२/१९ :
आज दि. ४/१२ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात काकडे पार्क परिसरातील आठवडे बाजार बाहेरील विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी २३
२. तिन चाकी टेम्पो १
३. लोखंडी बाकडे २
४. रसवंती मशीन १
५. प्लास्टीक क्रेट ९
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र.१ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी १७ होमगार्ड हजर होते.
पावर हाऊस चौक, चिंचवड येथे फुटपाथ वरील रसवंती गृहाची तक्रार प्राप्त आहे. व संबंधितास सदरचे रसवंती गृह काढुन घेण्यास सांगीतले होते. त्यांनी न काढल्याने सदरचे रसवंती मशीन जप्त करण्यात आली आहे.