ग व ह क्षे अनधिकृत बांधकाम कारवाई ४/१०/१९ :
दि. ०५/१०/२०१९
प्रसिध्दीसाठी
‘ग’ व ‘ह’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. ३२ जुनी सांगवी ,मध्ये आज दि.०४ /१०/२०१९ रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालु असलेले अनधिकृत आर.सी.सी. व वीट बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये प्रभाग क्र. ३२,जुनी सांगवी येथील ०१ बांधकामांवर ( अंदाजे १९२ चौ.मी ) कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री. सतीश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्री. हेमंत देसाई व इतर कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांचे पथकाने केली. सदर कारवाई ०८ मनपा पोलीस तसेच. २ ब्रेकर, २ ट्रक व ०७ मजूर यांचे सहकार्याने करणेत आली.
कार्यकारी अभियंता
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी , पुणे – ४११०१८