फ क्षे अनधिकृत बांधकाम कारवाई १७/०९/२० :
दि.१७/०९/२०१९
जाहीर निवेदन प्रसिद्धीसाठी
फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रं. ०१ व १२ येथे दि१७/०९/२०१९ रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चिखली व तळवडे विभागाच्या तक्रारीवरून या ठिकाणी चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी एकूण०४ अनधिकृत बांधकामावर (एकूण क्षेत्र २५५३.२०चौ.फुट) कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राणे यांचे मार्गदर्शनाखाली व उपअभियंता श्री. निंबाळकर, कनिष्ठ अभियंता २, बीट निरीक्षक ५ तसेच चिखली पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक- १, पोलिस (पुरुष)-१, महापालिका अतिक्रमण पथक, जे.सी.बी. २ व मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने करण्यात आली.
कार्यकारी अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी,
फ क्षेत्रीय कार्यालय,
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग,
पिंपरी,पुणे –१८