अ व ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.१९/०८/ :
दिनांक १९/८/२०१९ रोजी अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी म्हाळसाकांत चौक, संभाजी चौक, निगडी प्राधिकरण भेळ चौक, पिंपरी शगुन चौक,साई चौक,डी मार्ट चिंचवड, येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) फ्लेक्स /बॅनर्स १४
२) वजन काटा १
३) तीन चाकी टेम्पो २
तसेच डी मार्ट चिंचवड व कीज ९ हॉटेल शेजारील गल्लीमध्ये व पिंपरी मेन बाजार परिसरातील व रहाटणी फाटा ते डी मार्ट काळेवाडी, रहाटणी फाटा ते रहाटणी गाव येथील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे