अ व ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १७/२/२०२० :
आज दिनांक १७/२/२०२० रोजी अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक,जमतानी चौक, जयहिंद चौक,गेलॉर्ड चौक ते साई चौक ते शगुन चौक, शगुन चौक ते पिंपरी रेल्वे स्टेशन व भाजी मंडई परिसर, पिंपरी मेन बाजार ,हेमू कलानी गार्डन येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ९ नग
२) मोबाईल काऊंटर. ३ नग
३) जाहिरात बोर्ड. ५ नग
४) कापड दुकानदार यांनी बाहेर रस्त्यावर ठेवलेले पुतळे ६नग
५) लोखंडी जाळी. ५ नग
६) लोखंडी स्टॅण्ड ४ नग
७) लेडिज पर्स. ९ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी २ बिटनिरीक्षक हजर होते. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता.