अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि३१/१/२०२० :
दिनांक ३१/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील मोरवाडी चौक ते चिंचवड स्टेशन एम्पायर इस्टेट , चिंचवड स्टेशन परिसर, काळभोर नगर चिंचवड, येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. १९ नग
२) टपरी. २ नग
३) लोखंडी काऊंटर. ६ नग
४) लाकडी काऊंटर. ४ नग
५) लोखंडी मांडणी. १ नग
६) जाहिरात बोर्ड. १५ नग
७) लोखंडी स्टॅण्ड २ नग
८) लोखंडी जाळी. १ नग
९) लाकडी दिवाण १ नग
१०) लोखंडी कॉट. १ नग
११) कापडी छत्री. २ नग
१२) लाकडी तिपाई १ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता. सदर कारवाई कामी ठेकेदाराकडून ६ ट्रक, १ क्रेन भाड्याने घेण्यात आलेली आहे.