अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २०/११/१९ :
आज दिनांक २०/११/१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड मोहननगर, आकुर्डी खंडोबा माळ ते थरमॅक्स चौक ते कस्तुरी मार्केट, संभाजी नगर, चिंचवड बिग बाजार समोरील फुटपाथवरील, व चिंचवड स्टेशन परिसरातील, व पुढे पुणे मुंबई रस्त्यावरील व निगडी पवळे उड्डाणपूल ते भेळचौक रोडवरील व फुटपाथवरील, भेळ चौक ते संभाजी चौक येथील अनधिकृत व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या व पथारीधारक यांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे.तसेच खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) प्लास्टिक खुर्ची ९ नग
२) लोखंडी कॉट १ नग
३) कापडी छत्री मोठी १ नग
४) जाहिरात बोर्ड ७ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे