ड क्षे अनधिकृत बांधकाम कारवाई दि.२१ /०८/१९ :
मौजे पिंपळे गुरव प्रभाग क्र. २९ मध्ये आज दि.२१ /०८/२०१९ रोजी अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पिंपळे गुरव लक्ष्मीनगर, परिसरातील ६ पक्की आर.सी.सी.चालू असलेली बांधकामे अंदाजे क्षेत्रफळ १०५०० चौ.फुटाच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेत आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग यांचे पथकाने केली सदर कारवाई दोन जे.सी.बी., १ ट्रक, १ ब्रेकर ,१ पोकलेन तसेच १० मजुर, यांच्या सहाय्याने करणेत आली. सदर कारवाई मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच १० पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.