अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १/८/१९ :
आज दिनांक १/८/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी आंबेडकर चौकातील १ फ्लेक्स काढला आहे. तसेच भेळ चौक निगडी ते संभाजी चौक नियोजित महापौर बंगल्यासमोरील चायनीजच्या सर्व हातगाड्या ,टपऱ्यावर तसेच आकुर्डी रेल्वे स्टेशन ते केरळ भवन येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.तसेच मुंबई पुणे रोडवरील बजाज टेंपो कंपनी समोरील १ गॅरेजची टपरी वजा पत्राशेड निष्कसीत करण्यात आले आहे.
१) लोखंडी काऊंटर १३
२) लोखंडी टपरी ४
३) हातगाड्या ७
सदरची कारवाई पथक क्र.२ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी १२ पोलीस कर्मचारी हजर होते. सदर कारवाई कामी ठेकेदाराकडील ७ वाहने व १ क्रेनचा वापर करण्यात आला.