अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २९/७/१९ :
आज दिनांक २९/७/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी,निगडी, प्राधिकरण तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक, साई चौक, जयहिंद चौक, डिलक्स चौक, पिंपरी गाव याठिकाणी अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ५
२) जाहिरात बोर्ड ३
३) लोखंडी जाळी २
४) लोखंडी स्टॅण्ड ३
५) लाकडी स्टॅण्ड २
तसेच आकुर्डी रेल्वे स्टेशन येथील हातगाड्या ,टपऱ्या धारकांना हातगाड्या काढून घेणेबाबत समज देण्यात आली आहे.तसेच निगडी येथील नियोजित महापौर बंगल्यासमोरील चायनीजच्या हातगाड्या काढून टाकणेबाबत समज देण्यात आली आहे.
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे १० कर्मचारी हजर होते