क क्षे अनधिकृत बांधकामावर कारवाई १०/०७/१९ :
जाहीर निवेदन प्रसिद्धीसाठी दि. १०/७/२०१९
क क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र.२ चिखली (जाधववाडी) येथे आज दि. १०/७/२०१९ रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाई मध्ये प्रभाग क्र.०२ मधील गट न ५५९ बालघरे वस्ती रस्ता , जाधववाडी चिखली परिसरातील ०१अनधिकृत आर.सी.सी. बांधकामावर (एकूण क्षेत्रफळ अंदाजे २१२६.६० चौ.फुट) पाडण्यात आले.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र राणे यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्री. खरात यांचे सोबत महापालिका अतिक्रमण पथक,स्थानिक पोलीस,०३ जे.सी.बी., ०२ डंपर, मनपा कर्मचारी व १५ मजूर यांचे उपस्थितीत करण्यात आली.
कार्यकारी अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी,
क,,ई व फ क्षेत्रीय कार्यालय,
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग,
पिंपरी,पुणे –१८.