ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.०६/०७/१९ :
दिनांक ६/७/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक,साई चौक ते गेलाॅर्ड चौक, जयहिंद चौक,जमतानी चौक,तसेच काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा, नखाते वस्ती परिसरात अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात
आले आहे.
१) ६ हातगाड्या
२) १ प्लास्टीक टेबल
३) ५ जाहिरात बोर्ड
४) १ प्लास्टीक खुर्ची
५) १ लोखंडी जाळी
६) ३ वजन काटे
तसेच रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा येथील १६ हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कर्मचा-यामार्फत करण्यात आली आहे