ड क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १/७/१९ :
आज दि. १/७ रोजी ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात शिवार चौक ते कुणाल आयकॉन रोड वरील रस्त्याचे दोन्ही बाजुला असलेल्या विनापरवाना तसेच वाहतुकीस अडथळा करणाऱ्या हातगाड्या, टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो १
२. हातगाडी ८
३. टपरी १
४. लोखंडी काऊंटर २
५. प्लास्टीक क्रेट १३
६. स्टॅन्ड बोर्ड ५
वरील प्रमाणे अतिक्रमण कारवाई पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे. तसेच दोन बिट निरीक्षक, अतिक्रमण कडील १० पोलिस व १५ होमगार्ड हजर होते. तसेच ५ डंपर व १ क्रेन कारवाई कामी होत्या.