ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १६/३/२०२० :
आज दि. १६/३ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात चिंचवड परिसरात मोरया हॉस्पिटल, चाफेकर चौक, गांधी पेठ तसेच चित्तराव गणपती रोड या ठिकाणी अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १४
२. टपरी १
३. तिन चाकी टेम्पो १
४. जुने टायर ८
५. लोखंडी काऊंटर १
६. लोखंडी ब्लॅक बोर्ड १
७. लोखंडी टेबल २
८. लोखंडी खाट १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडून करण्यात आली असुन कारवाई कामी १ बिट निरीक्षक व अतिक्रमण कडील पोलिस पथक व चिंचवड पोलिस स्टेशन कडील पी आय सह पोलिस पथक हजर होते.