अनधिकृत बांधकामावर कारवाई :
दि.२७/६/२०१९
प्रसिध्दीसाठी
‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १६ येथील रावेत शिंदेवस्ती येथे आज दि.२७/०६/२०१९ रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये आर.सी.सी.- ०१ निष्कासित करण्यात आले सदर अनधिकृत बांधकामाचे एकुण क्षेत्रफळ ३२२८ चौ.फुट बांधकाम (३००चौ.मी.) इतके आहे.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री. सतिश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्री. अनिल शिंदे, ०३ कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांचे पथकाने केली. ०३ ट्रॅक्टर ब्रेकर, ०१ जे.सी.बी, ०१ डंपर व १० मजुर सदर कारवाई देहूरोड पोलीस स्टेशन कडील ०४ पोलिस कर्मचारी व मनपाकडील १६ पोलिस कर्मचारी तसेच मनपाकडील अतिक्रमणाचे १ वाहन, अग्निशामक वाहन, रुग्णवाहीका यांच्या बंदोबस्तमध्ये कारवाई करण्यात आली.
सही/-
कार्यकारी अभियंता
बांधकाम परवानगी व अनधिकृत
बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी , पुणे – ४११०१८