ब,ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि४/२/२०२० :
अ) आज दि. ४/२ रोजी सकाळ सत्रात ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात जुनी सांगवी, कृष्णा चौक, सृष्टी चौक या ठिकाणी विनापरवाना हातगाडी/टपरीवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी २१
२. लोखंडी टपरी २
सदर कारवाई कामी अतिक्रमण कडील ७ पोलिस कर्मचारी हजर होते.
ब) दुपार सत्र
ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात भारतमाता चौक, काळेवाडी परिसरात विनापरवान हातगाडी व टेम्पो अतिक्रमण कारवाईत जप्त करुन जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी २४
२. तिन चाकी टेम्पो २
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन दुपार सत्रात कारवाई कामी अतिक्रमण कडील पोलिस कर्मचारी हजर नव्हते.
आज रोजी अतिक्रमण कारवाईत एकुण जप्त केलेले साहित्य
१. हातगाडी ४५
२. लोखंडी टपरी २
३. तिन चाकी टेम्पो २