गक्षे अनधिकृत बांधकाम कारवाई दि.१६/०१/२०२० :
मौजे पिंपरी प्रभाग क्र. २१ मध्ये आज दि. १६/०१/२०२० रोजी अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पिंपरीगाव येथील वाघेरे कॉलनी क्र.१ मधील ०१ व्यावसायिक पत्राशेड अंदाजे क्षेत्रफळ १०००० चौ.फूट तसेच अशोक थियटर परिसरातील २ आर.सी.सी. वाढीव बांधकामे अंदाजे क्षेत्रफळ ३००० चौ. फुट असे एकूण १३००० चौ.फूट अनधिकृत बांधकामांवर
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री.शिरीष पोरेडी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ग’ प्रभाग यांचे पथकाने केली, सदर कारवाई २ जे.सी.बी.,१ ट्रक, १ ट्रक्टर ब्रेकर तसेच १२ मजुर, १० मनपा अधिकारी व कर्मचारी, तसेच १२ मनपा पोलीस व ०४ स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.