ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.७/१/२०२० :
आज दि. ७/१ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात चिंचवड येथील मोरया गोसावी मंदीर परिसर व केशव नगर काकडे पार्क येथील विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या व टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ८
२. लोखंडी/स्टील टपरी १५
३. लाकडी काऊंटर १
४. लोखंडी बाकडा १
५. लोखंडी फुटरेस १
६. तिन चाकी टेम्पो १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी २ बिट निरीक्षक हजर होते.