ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.८/१/२०२० :
आज दिनांक ८/१/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा ते वाकड फाटा ते १६ नंबर बसस्टॉप ते काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथे अतिक्रमण कारवाई करुन रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या व पथारीधारक यांचे अतिक्रमण हटविण्यात येऊन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या २ नग
२) लोखंडी काऊंटर १ नग
३) फ्लेक्स बॅनर्स. ५
४) जाहिरात बोर्ड ६
५) लोखंडी फ्रेम २
६) लाकडी फ्रेम २
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी ६ पोलीस कर्मचारी हजर होते.