क क्षे अनधिकृत बांधकाम कारवाई दि२१/१२/१९ :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘क’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दि. २१/१२/२०१९ रोजी कारवाई करणेत आली. जाधववाडी चिखली (प्रभाग क्र.२ ) भागातील०९वाढीव व नव्याने आर.सी.सी., पत्राशेड, वीटबांधकाम इ. अनधिकृत बांधकामावर अंदाजे ९९७९.०० चौ.फु. बांधकामावर कारवाई करणेत आली. अशाप्रकारे प्रभाग क्र.२ मधील ९ अनाधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.
हि कारवाई २ जेसीबी, १ डम्पर, १० मजूर,आणि मनपाचे ०९ पोलीस कर्मचारी अधिकारी, चिखली पोलीस स्टेशन १५ पोलीस कर्मचारी अधिकारी याचे सहकार्याने केली. सदर कारवाई ‘क’ प्रभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता श्री.राजेंद्र राणे यांचे मार्गदर्शनाखाली व २ उपअभियंता, २ कनिष्ठ अभियंता यांचेसह ०७ स्थापत्य अभी.सहाय्यक तसेच, १० मनपा कर्मचारी यांचे पथकाने केली
कार्यकारी अभियंता,(क,ई,फ प्रभाग )
बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड मनपा