ग क्षे अनधिकृत बांधकाम कारवाई दि.०३/१२/१९ :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दि. ०३/१२/२०१९ रोजी कारवाई करणेत आली. रहाटणी (प्रभाग क्र.२७ ) भागातील १२ वाढीव व नव्याने आर.सी.सी., पत्राशेड, वीटबांधकाम इ. अनधिकृत बांधकामावर अंदाजे १०,२३३.०० चौ.फु. बांधकामावर कारवाई करणेत आली. अशाप्रकारे प्रभाग क्र.२७ मधील १२ अनाधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.
हि कारवाई ०१ पोकलेन , २ जेसीबी, १ डम्पर, १५ मजूर, ३ ब्रेकर आणि मनपाचे १६ पोलीस कर्मचारी अधिकारी, वाकड पोलीस स्टेशन १५ पोलीस कर्मचारी अधिकारी याचे सहकार्याने केली. सदर कारवाई ‘ग’ प्रभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता श्री.शिरीष पोरेडी यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्री.अनिल राउत व , ४ कनिष्ठ अभियंता यांचेसह १० बीट ऑफिसर, १० मनपा कर्मचारी यांचे पथकाने केली
कार्यकारी अभियंता,(अ व ग)
बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड मनपा