ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०२/१२/१९ :
आज दि. २/१२ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात सांगवी परिसरात साठ फुटी रस्ता ते रामकृष्ण मंगल कार्यालया पर्यंत तसेच जुनी सांगवी तुळजा भवानी नगर व कृष्णा चौक या परिसरात विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ३४
२. तिन चाकी टेम्पो १
३. जाहीरात स्टॅन्ड बोर्ड ९
४. लोखंडी काऊंटर १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी अतिक्रमण कडील पोलिस पथक तसेच १० होमगार्ड व १ बिट निरीक्षक हजर होते