ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २३/११/१९ :
आज दिनांक २३/११/१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते साई चौक ते गेलॉर्ड चौक ते जयहिंद चौक येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.तसेच तापकीर चौक ते रहाटणी फाटा ते नखाते वस्ती येथे फुटपाथवरील दुकानदारांचे साहित्य व नखाते वस्ती ते छत्रपती चौक, नखाते वस्ती ते काळेवाडी फाटा येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ६ नग
२) प्लास्टिक बादली छोट्या मोठ्या. ६१ नग
३) कापडी जर्किन १ नग
४) कापडी लेडीज टॉप १ नग
५) प्लास्टिक बॉडी ३ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदरची कारवाई कामी होमगार्ड चे ४ कर्मचारी हजर होते.