क क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.२३/७/१९ :
आज दिनांक 23/7/2019 रोजी 1) कोयना नगर चौक, सिद्धि पार्क सोसायटी येथून सारथी हेल्प लाईन वरील प्राप्त तक्रारी नुसार पहाणी केली असता तक्रार दार यांचे म्हणणे आहे महाबली हनुमान मंदिर च्या प्रवेश दारा जवळ व रोड च्या बाजूस नागरिकांना बसण्या करता म. न. पा. द्वारे बसवण्यात आले ल्या लोखंडी खुर्च्या व लाकडी बाकडे जप्त करावे तथापि सदर खुर्च्या व लाकडी बाकडे हे नागरिकांना बसण्याची व्यवस्था म्हणून बसवले असून सदर खुर्च्या व लाकडी बाकडे जप्त करणे अथवा काढून टाकणे अतिक्रमण विभागाचे कार्यक्षेत्रात मोडत नाही याची तक्रार दार व्यक्ती जाणिव करुन दिली व तक्रार निरस्त करत असलेबाबत समक्ष फोन वर सांगितले.
2) राष्ट्रीय जैविक संशोधन संस्था सेक्टर 21 विंग 10 बिल्डिंग नंबर 34 35 36 निगडी प्राधिकरण येथून प्राप्त तक्रारी नुसार पहाणी केली व अनधिकृत रित्या उभारलेले 2 मंडप स्टॉल व एक लाकडी जुनी हातगाडी जाग्यावर निष्कासित केली तसेच 3 पक्क्या टप-या चा सर्वे केला असता एक टपरी धारक याने मनपाचे
लायसेन्स स्थिर परवाना दाखविला असून उर्वरीत 2 टपरी धारक यांचे फोन वर संपर्क साधून उद्या दाखवणार आहे. तक्रार दार याना त्याबाबत कळवले. तक्रार परवाने पहावयास मिळे पर्यंत पेंडिंग राहील
3) मा. नगरसेवक समीर मासूळकर यांचे फोन वरून प्राप्त तक्रारी नुसार अजमेरा हाय स्कूल व परीसरात अतिक्रमण हटाव कारवाई करून हातगाडय़ा, टेम्पो,
पथरीवाले यांनी केलेली अतिक्रमण हटवली अतिक्रमण मुक्त चौकाचे फोटो काढले व Masulkar यांच्या ऑफिस मध्ये तसे कळवले.
4) कारवाई दरम्यान पुढीलप्रमाणे फ्लेक्स काढले
1) पूर्णा नगर 2
2) कोयना चौक 4
3) थरमॅक्स चौक 2
4) अजमेरा 2
एकूण 10 फ्लेक्स 8 बॅनर्स 19 जाहिरात फलक निष्कासित करण्यात आले. 3 लोखंडी पाईप जप्त केले सारथी हेल्प लाईन वरील 2 तक्रारी निवारण केले
सदर कारवाई पथक 3 चे अधिकारी कर्मचारी व होमगार्ड यांनी केली. कारवाईत मनपाचे पोलीस अथवा मशीनरी काहीएक वापरले नाही.