ब प्रभाग अनधिकृत बांधकाम कारवाई दि.१८/७/१९ :
बातमी प्रसिद्धी कामी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दि. १८/०७/२०१९ रोजी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणेत आली. काळेवाडी (प्रभाग क्र. २२) - नढेनगर, राजवाडेनगर परिसरातील इंद्रप्रस्थ कॉलनी, राजवाडेनगर कॉलनी, महाराष्ट्र/इंडिअन कॉलनी येथील ०८ वाढीव व नव्याने बांधलेली आर.सी.सी., वीटबांधकाम, पत्राशेड इ. अनधिकृत बांधकामांवर अंदाजे ४५१०.०० चौ.फु. बांधकामांवर कारवाई करणेत आली.
हि कारवाई २ जेसीबी, १ डम्पर, १० मजूर, १ ब्रेकर आणि पिं.चिं. पोलीस आयुक्तालयाचे व मनपाचे २० पोलीस कर्मचारी अधिकारी यांचे सहकार्याने केली. सदर कारवाई ‘ब’ प्रभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली व १ उपअभियंता, १ कनिष्ठ अभियंता यांचेसह ५ बीट ऑफिसर, १० मनपा कर्मचारी यांचे पथकाने केली.