अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि१६/७/१९ :
दिनांक १६/७/२०१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी मेन बाजार येथील दुकानाबाहेर फुटपाथवर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या गॅस कटरने कापून खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) १९ लोखंडी जाळी
२) १ लोखंडी पलंग
३) १ टेबल
तसेच काळेवाडी, रहाटणी फाटा, नखाते वस्ती, पिंपरी गेलॉर्ड चौक, जयहिंद चौक,येथील २३ अनधिकृत फ्लेक्स काढणेत आले आहेत..पिंपरी येथे कारवाई कामी १० पोलीस कर्मचारी हजर होते तसेच १० होमगार्ड हजर होते. तसेच १ कनिष्ठ अभियंता व १ बीटनिरीक्षक हजर होते.सदरची कारवाई अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कर्मचा-यामार्फत करण्यात आली आहे.तसेच ठेकेदाराकडील २ गॅस कटर,१ ट्रक,१ जेसीबीचा वापर करणेत आला आहे.