ब क्षे धोकादायक सीमाभिंत कारवाई दि.११/७/१९ :
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग
दि.११/०७/२०१९
प्रसिध्दीसाठी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दि. ११/०७/२०१९ रोजी ब क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रा अंतर्गत प्र.क्र १६ मधील सं.न ४३,लोटस वृंदावन सोसायटी व वेदांत पुरम सोसायटी,विकास नगर किवळे येथील सामाईक धोकादायक सीमाभिंत निष्कासित करणेत आले.सदर सामाईक धोकादायक सीमाभिंतीची लांबी ६० मी आहे.
सदर कारवाई मा.सहशहर अभियंता यांचे अधिपत्याखाली महापालिकेचे संबंधीत कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली ०१-उपअभियंता,बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम/अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभागाचे समन्वयक तसेच ०१-कनिष्ठ अभियंता, ०२-बीट निरीक्षक तसेच होमगार्ड-१०,जे.सी.बी-०२,डंम्पर-०१,मजूर-१० इत्यादी बंदोबस्तामध्ये करणेत आली.