अ क्षे अनधिकृत बांधकामावर कारवाई ०९/०७/१९ :
दि. ०९/०७/२०१९
प्रसिध्दीसाठी
‘अ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. १५ आकुर्डी येथे दि. ०९/०७/२०१९ रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी, अ.बा.नि. व अतिक्रमण निर्मुलन विभागाने चालु असलेले अनधिकृत आर.सी.सी. बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये प्रभाग क्र. १५ आकुर्डी येथील ५ आर.सी.सी. ( अंदाजे ५४०३.५२ चौ.फुट ) निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री. शिरीष पोरेडी यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता श्री. नरेश रोहीला, कनिष्ठ अभियंता व बीट निरिक्षक यांचे पथकाने केली. सदर कारवाई ०२ जे.सी.बी., ०२ ट्रॅक्टर ब्रेकर, ०१ ट्रक, २० मजुर, २३ पुरूष व ०७ महिला मनपा पोलीस तसेच निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी २, पुरूष कर्मचारी १८ व ०३ महिला कर्मचारी यांचे बंदोबस्तासह करणेत आली.
कार्यकारी अभियंता
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी , पुणे – ४११०१८