ब क्षे अनधिकृत बांधकामावर कारवाई ४/७/१९ :
दि.०४/०७/२०१९
जाहीर निवेदन प्रसिध्दीसाठी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.१६ येथील रावेत,किवळे-मामुर्डी येथे दि.०४/०७/२०१९ रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये आर.सी.सी.- ०३ व पत्राशेड-०१,वीट बांधकाम-०१, असे ०६ बांधकाम ६२५ चौ.मी (६७२३ चौ.फुट.) बांधकाम पाडण्यात आले. सदर कारवाई महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केली
सदर कारवाई संबंधीत कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता-०१, कनिष्ठ अभियंता-०२ व बीट निरीक्षक-०३ यांचे पथकाने आणि मनपा होमगार्ड कर्मचारी-१५, ट्रक्टर ब्रेकर-०२,जे.सी.बी-०२,डंम्पर-०१,मजुर-१०, मनपा कर्मचारी तसेच पोलीस आयुक्त पोलिस,चिंचवड यांचेकडील पोलिस बंदोबस्तामध्ये करणेत आली.
सहशहर अभियंता
बांधकाम परवानगी व अनधिकृत
बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी , पुणे – ४११०१८