ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १३/३/२०२० :
आज दि. १३/३ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात सांगवी परिसरात पी डब्लु डी ग्राऊंड सभोवती असलेल्या पोलिस चौकी ते माकन हाॅस्पीटल पर्यंत विनापरवाना व तक्रार प्राप्त एकुण १५ टपऱ्या जागेवर निष्काशित करण्यात आल्या तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ४
२. लोखंडी टपरी ३
३. स्टील टाकी १
४. प्लास्टीक खुर्ची १
५. प्लास्टीक स्टुल ५
६. लोखंडी स्टॅन्ड बोर्ड १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी कनिष्ठ अभियंता १ व बिट निरीक्षक १ तसेच अतिक्रमण कडील पोलिस पथक व ७ होमगार्ड हजर होते.