ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई ७/३/२०२० :
आज दि. ७/३ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पी डब्लु डी मैदान येथील पवना थळी जत्रेच्या बाहेरील पार्कींगच्या जागेतील तसेच फुटपाथ वरील विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे पथारी व्यावसाईक, फेरीवाले हटविन्यात आले. तसेच ह व ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात संत तुकाराम नगर, कृष्णा चौक, बा रा घोलप, रक्षक चौक ते सांगवी फाटा या परिसरात विनापरवाना हातगाड्या, टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ३४
२. लोखंडी टपरी १
३. चार चाकी टेम्पो १
४. तिन चाकी टेम्पो २
५. प्लास्टीक क्रेट ६२
६. मोढी छत्री २
७. लाकडी काऊंटर २
८. लोखंडी काऊंटर १
९. प्लास्टीक टेबल ४
१०फ्लास्टीक स्टुल ८
११लाकडी रसाचा हातगाडा १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडून करण्यात आली