ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २७/२/२०२० :
दिनांक २७/२/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील तापकीर चौक ते काळेवाडी फाटा, काळेवाडी फाटा ते डांगे चौक ते गणेश मंदिर , डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटल थेरगाव येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) लोखंडी टपरी. २ नग
२) लाकडी टपरी. २ नग
३) हातगाड्या. ४ नग
४) जाहिरात बोर्ड. १३ नग
५) लोखंडी जाळी. ५ नग
६) लोखंडी स्टॅण्ड. १ नग
७) मोठी कापडी छत्री. २ नग
८) छत्री लोखंडी स्टॅण्ड. १ नग
९) लोखंडी बाकडा. १ नग
१०) टायर ट्युब. १ नग
११) प्लास्टिक कॅरेट. २४ नग
१२) पाणिपुरी स्टॅण्ड. २ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी पोलीस व होमगार्ड बंदोबस्त उपलब्ध होता