ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.७/२/२०२० :
दिनांक ७/२/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रहाटणी, नखाते वस्ती, तांबे शाळा, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा ते डांगे चौक थेरगाव, वाकड पोलीस स्टेशन ते वाकड फाटा डांगे चौक थेरगाव येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ५ नग
२) प्लास्टिक कॅरेट. ८ नग
३) फ्लेक्स बॅनर्स ५ नग
४) जुन्या प्लास्टिक खुर्ची. ५ नग
५) लोखंडी पाईप. २ नग
रहाटणी तांबे शाळा येथे रस्त्यावरील १०*१५ चे भाजी विक्री शेड निष्कसीत करण्यात आले आहे. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता.