ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.३/२/२०२० :
दिनांक ३/२/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी साई चौक ते गेलॉर्ड चौक, अशोक थिएटर, रहाटणी काळेवाडी फाटा, १६ नं. बसस्टॉप,वाकड फाटा ते वाकड पोलीस स्टेशन, लक्ष्मणनगर,गुजरनगर,पवारनगर, थेरगाव गावठाण, तापकीर चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) प्लास्टिक बॅरल. ५ नग
२) लोखंडी रॅक. २नग
३) जाहिरात बोर्ड. ९ नग
४) लोखंडी टायर खोलण्याचे मशीन. १ नग
५) जुने टायर. ७ नग
६) फ्लेक्स बॅनर्स. १४ नग
थेरगाव डांगे चौक ते काळेवाडी फाटा येथील महावितरणचे टॉवरवरील सर्व फ्लेक्स बॅनर्स काढणेत आलेले आहेत. वाकड फाटा ते वाकड पोलीस स्टेशन रोडवरील दुकानदारांनी फुटपाथवर ठेवलेले साहित्य काढण्यात आले आहे.सदरची कारवाई पथक क्र. २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.