ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई :
आज दि. २१/१ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पिंपळे गुरव परिसरात रामकृष्ण मंगल कार्यालय ते साठ फुटी रस्ता या ठिकाणी तसेच संत तुकाराम नगर फायर आॅफीस समोरील विनापरवाना तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व तक्रार प्राप्त हातगाड्या टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १५
२. लोखंडी टपरी ७
३. लोखंडी स्टॅन्ड बोर्ड ९
४. लाकडी काऊंटर २
५. लोखंडी पिंजरा १
६. लोखंडी टेबल १
७. लोखंडी टेबल फ्रेम १
८. प्लास्टीक ड्रम १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी ३ बिट निरीक्षक, ६ होमगार्ड व अतिक्रमण कडील ४ पोलिस कर्मचारी हजर होते.