ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १८/१/२०२० :
आज दि. १८/१ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात रावेत परिसरात भोंडवे कॉर्नर प्रथमेश वाईन शॉप समोरील रस्त्यावरील, विनापरवाना हातगाडीवर भाजी, फळं विक्रेते यांचेवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी २८
२. तिन चाकी टेम्पो ५
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी अतिक्रमण कडील ३ पोलिस कर्मचारी व ७ होमगार्ड हजर होते.