अ क्षे.अनधिकृत बांधकाम कारवाई दि२१/०१/२०२० :
दि. २१/०१/२०२०
प्रसिध्दीसाठी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र.१४ मौजे आकुर्डी येथील विठ्ठलवाडी व मोहननगर येथे आज दि. २१/०१/२०२०रोजी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत खालीलप्रमाणे एकूण ५ अनधिकृत बांधकामावर ( एकुण क्षेत्र १८७७.०० चौ. फुट ) कारवाई करणेत आली.
१) श्रीम. सुनिता अजिनाथ ओगले, आकुर्डी ( आर.सी.सी.)
२) श्री. पवार दादाजी पांडुरंग, आकुर्डी ( विटबांधकाम)
३) श्री. सोमनाथ ज्ञानेश्वर हुच्चे, आकुर्डी ( आर.सी.सी.)
४) श्रीम. मंजुळाबाई विलास नलवडे, आकुर्डी ( आर.सी.सी.)
५) श्रीम. स्मिता सातारकर, आकुर्डी ( शेड )
सदर कारवाई शहर अभियंता श्री. राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्री. शिरीष पोरेडी यांचे मार्गदर्शनाखाली १ उपअभियंता, २ कनिष्ठ अभियंता व १० बीट निरीक्षक, यांचे पथकाने केली. सदर कारवाईस- महानगरपालिका पोलिस - २६, स्थानिक पोलीस- १६, पोलिस ऑफीसर-२, महिला पोलीस ६, १ डंपर, १ जे.सी.बी., २ कॉम्प्रेसर ट्रॅक्टर, १५ ठेकेदार मजुर, वायरमन-१, आग्निशामक दल, अँब्युलन्स यांचे सहाय्याने करणेत आली.
सही/-
कार्यकारी अभियंता (अ व ग)
बांधकाम परवानगी व अनधिकृत
बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी , पुणे – ४११०१८