अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.७/१/२०२० :
आज दिनांक ७/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील निगडी येथील कै. मधुकर पवळे उड्डाणपूल येथील फॉरमायका कंपनी समोरील फुटपाथवरील व पुलाखालील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. तसेच सदर ठिकाणचे फ्लेक्स काढण्यात आलेले आहेत.सदर ठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकांना हटविण्यात येऊन सर्व भंगार साहित्य काढण्यात आले आहे. सदरचे साहित्य कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे