ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२/१/२० :
आज दिनांक २/१/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील डांगे चौक थेरगाव येथील अनधिकृत हातगाड्या वर अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ४
२) जाहिरात बोर्ड ४
तसेच डांगे चौक ते पंडित पेट्रोल पंप ते डांगे चौक थेरगाव येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे.तसेच १६ नंबर बसस्टॉप येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी येथील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली