ड क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०५/०१/२० :
आज रविवार दि. ५/१ रोजी मा. कार्यकारी अभियंता यांचे कडील आदेशान्वये ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पिंपळे गुरव परिसरात सृष्टी चौक, कृष्णा चौक तसेच संत तुकाराम नगर येथील एस टी स्टॅन्ड समोर व पोलिस चौकी समोरील परिसरात विनापरवाना तसेच वाहतुकिस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या,टपऱ्या तसेच टेम्पो मधील खाद्य पदार्थ विक्रेतै यांचेवर अतिक्रमण कारवाई करुन पूढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ३०
२. स्टील टपरी २
३. लोखंडी टपरी २
४. चार चाकी टेम्पो ४
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी अतिक्रमण कडील ७ पोलिस कर्मचारी हजर होते.