ब क्षे.अनधिकृत बांधकाम कारवाई दि४/१/२०२० :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दि. ०४/०१/२०२० रोजी कारवाई करणेत आली. वाल्हेकरवाडी (प्रभाग क्र.१७ )भागातील, हरित पट्ट्यातील ०८ वाढीव व नव्याने आर.सी.सी., वीटबांधकाम इ. अनधिकृत बांधकामावर अंदाजे ९५१०चौ.फु. बांधकामावर कारवाई करणेत आली. अशाप्रकारे प्रभाग क्र. १७ मधील ०८ अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.
हि कारवाई ०१ पोकलेन, २ जेसीबी, १ डम्पर, १० मजूर आणि मनपाचे १६ पोलीस कर्मचारी अधिकारी, चिंचवड पोलीस स्टेशन ३० पोलीस कर्मचारी अधिकारी याचे सहकार्याने केली. सदर कारवाई ‘ब’ प्रभाग अंतर्गत कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली व १ उपअभियंता, ३ कनिष्ठ अभियंता यांचेसह १२ स्थापत्य अभी.सहा., यांचे पथकाने केली