तळवडे येथील अनधिकृत बांधकामे कारवाई :
दि.३०/१२/२०१९
जाहीर निवेदन प्रसिद्धीसाठी
फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रं. १२ तळवडे येथे दि. ३०/१२/२०१९ रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्रिवेणीनगर, तळवडे येथील टॉवर लाईन येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये एकूण ३७ अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे (एकूण क्षेत्रफळ ४९०३.०० चौ.फुट) पाडण्यात आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राणे यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्री. निंबाळकर यांचे सोबत चिखली पोलिस स्टेशन येथील स्थानिक पोलिस बदोबस्त, महापालिका अतिक्रमण पथक, ०२ जे.सी.बी., ०१ डंपर, मनपा कर्मचारी व मजूर यांचे सहकार्याने करण्यात आली.