फ क्षे अनधिकृत बांधकाम कारवाई दि.२४/१२/१९ :
प्रसिद्धीसाठी
फ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रं. ०१ चिखली येथे दि. २४/१२/२०१९ रोजी महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत चिखली या ठिकाणी चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी एकूण १४ अनधिकृत बांधकामावर (एकूण क्षेत्र १०७२.४२ चौ.मी.) कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई अतिरीक्त आयुक्त श्री. अजित पवार, सहशहर अभियंता राजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता श्री राजेंद्र राणे यांच्या अधिपत्याखाली व उपअभियंता श्री. निंबाळकर व श्री. खरात, कनिष्ठ अभियंता ४, बीट निरीक्षक ८ तसेच चिखली पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक - १, पोलिस (पुरुष) - ५, पोलिस (महिला) - ३, महापालिका अतिक्रमण पथक,जे.सी.बी.३ व मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने करण्यात आली.
कार्यकारी अभियंता तथा पदनिर्देशित अधिकारी, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग,
पिंपरी,पुणे –१८