ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२३/१२/१९ :
आज दि. २३/१२ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात मुकाई चोक परिसरात विनापरवाना व वाहतुकिस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी ११
२. लोखंडी टपरी ४
३. लोखंडी काउंटर ३
४. लोखंडी स्टॅन्ड बोर्ड ३
५. लोखंडी वजन काटे ५
६. गॅस शेगडी २
७. तिन चाकी टेम्पो १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी २ बिट निरीक्षक हजर होते तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक व ६ होमगार्ड हजर होते.