अ क्षे.अनधिकृत बांधकाम कारवाई दि२३/१२/१९ :
दि. २३/१२/२०१९
कृपया प्रसिध्दीसाठी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ‘अ’ क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्र. १४ मौजे आकुर्डी येथे आज दि.२३/१२/२०१९रोजी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण आणि अतिक्रमण निर्मुलन विभागाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये आकुर्डी येथील ९ आर.सी.सी. अनधिकृत बांधकामांवर (६६०६ चौ.फुट), कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई कार्यकारी अभियंता श्री. शिरीष पोरेडी यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्री. नरेश रोहिला, ३ कनिष्ठ अभियंता व १० स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) यांचे पथकाने केली. सदर कारवाई पिंपरी पोलिस स्टेशनचे व २ सहायक पोलिस निरीक्षक, २० पोलिस, तसेच महानगरपालिकेचे १०पोलिस, अतिक्रमण पथक ,१ जे.सी.बी., २ ट्रँक्टर १ डंपर, १५ ठेकेदार मजुर यांचे साहाय्याने करणेत आली.
सही/-
कार्यकारी अभियंता (अ व ग)
बांधकाम परवानगी व अनधिकृत
बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी , पुणे – ४११०१८