ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि २२/१२/१९ :
आज रविवार दि. २२/१२ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पिंपळे गुरव परिसरात बा रा घोलप विद्यालय, कृष्णा चौक, सृष्टी चौक, ६० फुटी रस्ता तसेच डायनासोर पार्क येथे विनापरवाना व वाहतुकिस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी २५
२. लोखंडी टपरी १
३. लोखंडी पिंजरा ३
४. पान काउंटर १
५. लोखंडी फ्रेम ५
६. प्लास्टीक क्रेट ४८
७. तिन चाकी टेम्पो २
तसेच १ लाकडी टपरी व १ पत्रा शेड नष्ट करण्यात आले. व डायनासोर पार्क येथील अंदाजे २५ ते ३० भाजी विक्रेते पथारी व्यावसाईक हटविन्यात आले.
तसेच १३ विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी बिट निरीक्षक १ व ६ होमगार्ड हजर होते.