ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१८/१२/१९ :
दिनांक १८/१२/१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील गणेश नगर पंडित पेट्रोल पंप ते डांगे चौक थेरगाव येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ६ नग
२) प्लास्टिक खुर्ची ८ नग
३) टेन्ट १ नग
४) स्टेनलेस स्टील स्टॅण्ड १ नग
५) जाहिरात बोर्ड ३ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी १० पोलीस कर्मचारी व १ बिटनिरीक्षक हजर होते.