ग.क्षे.का.थेरगाव अनधिकृत कारवाई :
‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.२४, थेरगांव येथील आज दि.-२८/११/२०१९रोजी महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालु असलेले अनधिकृत आर.सी.सी. बांधकामावर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये थेरगांव येथील ३६२५.००चौ.फुट. असलेले अनधिकृत ४ आर.सी.सी. बांधकामावर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मा. अतिरिक्त आयुक्त २, सहशहर अभियंता व संबधित प्रभागाचे कार्यकारी अभियंता यांचे मार्गदर्शनाखाली उपअभियंता, कनिष्ट अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे पथकाने केली. सदर कारवाई १५ पोलिस, १० होमगार्ड, ०१ जे.सी.बी, ०३ ट्रक्टर ब्रेकर, ०१ ट्रक, १० मजूर व १५ मनपा कर्मचारी यांचे सहकार्याने करणेत आली.
कार्यकारी अभियंता
बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी , पुणे – ४११०१८